रेमडेसिवीर साठा प्रकरणी गुन्हा दाखल करा

- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी
रेमडेसिवीर साठा प्रकरणी गुन्हा दाखल करा

मुंबई । प्रतिनिधी

निर्यातीसाठी असलेला रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा अंमळनेर, नंदुरबारमध्ये वाटप केल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी तसेच ब्रूक फार्मा कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंगळवारी केली.

रुग्णांचे नातेवाईक पायपीट करत असताना आणि राज्य सरकारलाही या इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा होत नसताना ८ एप्रिल आणि १२ एप्रिल रोजी शिरीष चौधरी यांनी अंमळनेर, नंदुरबारला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना त्यांनी ही औषधे खाजगीरित्या कशी वाटली? असा सवाल सावंत यांनी केला.

भाजपा नेत्यांचे आणि ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते हे उघड आहे. त्यामुळे ब्रुक फार्मा कंपनी आणि भाजप नेत्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, असे सावंत म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com