मालवाहतुकीवरील अतिरिक्त दंड रद्द करा

- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मालवाहतुकीवरील अतिरिक्त दंड रद्द करा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

ट्रक, टेम्पो, पिकअप Truck, tempo, pickup यासारख्या मालवाहतूक गाड्यांमध्ये freight trucks निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा एक किलो माल जरी जास्त आढळला तरी ओव्हरलोडच्या नियमाखाली Under the rule of overload किमान ६८ हजार रुपये दंड fine आकारण्यास केंद्रीय परिवहन मंत्रालयाने Union Ministry of Transport सुरवात केली आहे.

याचा मोठा आर्थिक फटका वाहतूकदारांना बसत आहे. त्यामुळे हा नियम महाराष्ट्रात रद्द करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress state president Nana Patole यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांच्याकडे केली आहे.

कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. मागील दोन वर्षांपासून नागरिक कोरोनामुळे त्रस्त झाले आहेत. उद्योग, व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे. त्यात आता केंद्रीय परिवहन मंत्रालयाने मालवाहतुकीसंदर्भात जाहीर केलेली नियमावली जाचक ठरत असून ही अन्यायपूर्ण नियमावली महाराष्ट्र सरकारने रद्द करावी, असे पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

केंद्र सरकारच्या परिवहन मंत्रालयाने ही नियमावली महाराष्ट्रातही लागू केली आहे. या नियमावलीने शेतकरी, मालवाहतूकदार यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे आपण या प्रकरणी लक्ष घालून महाराष्ट्रात हे जाचक नियम रद्द करून दिलासा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com