मांसाहाराचा सल्ला देणाऱ्या आमदाराच्या राजीनाम्याची मागणी

हिंदू संघटना एकवटल्या
मांसाहाराचा सल्ला देणाऱ्या आमदाराच्या राजीनाम्याची मागणी

औरंगाबाद - Aurangabad :

करोना घालवायचा असेल तर मांसाहार करा, असा सल्ला देणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड हिंदूत्ववादी संघटनाच्या निशाण्यावर आले आहेत.

आमदार साहेब तुम्ही कधीपासून डॉक्टर झालात ? असा खाेचक सवाल करतांनाच माफी मागा, राजीनामा द्या, नाही तर फिरू देणार नाही, असा इशारा हिंदूत्ववादी संघटनांनी दिला आहे.

संघटनांच्यावतीने भावना दुखावल्याप्रकरणी राज्यभरात पोेलिसात तसेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तक्रार दिली जाणार आहेत.

"कोरोनामध्ये मंदिरे बंद आहेत, देव पण लॉक आहेत. तुम्हाला वाचवायला कुणीच येणार नाही. स्वतःलाच स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून उपास-तापास बंद करा.

रोज ४ अंडी, एक दिवसाआड चिकन आणि प्रोटिनयुक्त पदार्थ खा’, असा सल्ला शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी एका मुलाखतीत हिंदू समाजाला दिला होता. याचा राज्यभरात निषेध होत आहे.

रिकामेे सल्ले देवू नका

हिंदूंना मांसाहाराचा सल्ला देणे ही विकृत मानसिकता आहे. ही मानसिकता समाजासाठी हानिकारक असून त्याचा हिंदूू धर्माला मोठा धोका आहे. आमदार गायकवाड यांचे वक्तव्य निर्बुद्धपणाचे असून हिंदू धर्मात तेढ निर्माण करणारे आहे. यामुळे हिंदू परंपरा आणि देवी- देवतांचा अपमान झाला आहे. हिंदू धर्मीय आपले निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत. आमदार गायकवाड यांनी रिकामे सल्ले देण्यापेक्षा कोरोना कमी करणे आणि मतदारसंघाच्या विकासात लक्ष घालावे असा सल्ला भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष संजय जोशी यांनी दिला.

माफी मागा, राजीनामा द्या

आमदार गायकवाड यांनी जाहीर माफी मागावी व आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पुरोहित संघटनेचे अध्यक्ष विश्वास नागापुरकर. संघटन अध्यक्ष सुभाष मुळे, गणेश अंबडकर. महेश जोशी, गणेश पाठक, श्रावण फडे, स्पप्निल वानेगावकर, स्वप्निल पैठणकर, बालाजी कुलकर्णी, संतोष पटवर्धन, ब्राह्मण महिला मंचच्या अध्यक्ष विजया कुलकर्णी, संगिता शर्मा, मिना झाल्टे, विजया अवस्ती, आर्य समाजाचे अॅड. विजय चव्हान, जुगलकिशोर दायमा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचेदयाराम बसैय्यै बंधु यांनी केली आहे.

मुस्लिम समाजही नाराज

मुस्लिम समाजाला जास्त कोरोना होत नाही, ते मांस भक्षण करून स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून जगतात, या आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यावर मुस्लिम संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात हे वक्तव्य दुखद असून धार्मिक भावना दुःखावल्याचे संघटनांनी म्हंंटले आहे. गेल्या महिन्यात करोनावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह्य भाषेचा वापर केल्यामुळे आमदार गायकवाड चर्चेत आले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com