लसींचा जादा पुरवठा करण्याची मागणी

आरोग्यमंत्री राजेश टोपे
लसींचा जादा पुरवठा करण्याची मागणी

मुंबई | प्रतिनिधी Nashik

करोना प्रतिबंधित लसीकरणाला Corona Vaccination काही लोकांचा विरोध आहे, काहींच्या मनात लसीकरणाबाबत गैरसमज आहेत. त्यामुळे देशात लसीकरण सक्तीचे करण्यासाठी केंद्राने काही उपाययोजना कराव्यात, अशी सूचना महाराष्ट्राच्यावतीने Maharashtra करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे Health Minister Rajesh Tope यांनी गुरुवारी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनावरील उपाययोजांनाबाबत संवाद साधला. या बैठकीत महाराष्ट्राच्यावतीने राजेश टोपे सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरीएंट आहेत. पण महाराष्ट्रात ७० टक्के केसेस डेल्टा व्हेरीएंटच्या आणि तीस टक्के केसेसे ओमायक्रोनच्या आढळत आहेत. त्यामुळे डेल्टा आजही प्रभावशाली आहे, असे टोपे यांनी सांगितले.

आजच्या बैठकीत आम्ही केंद्राकडे लसींचा जादा पुरवठा करण्याची मागणी केली. हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, तरुणांचा गट आणि ज्येष्ठ नागरिकांना कोव्हॅक्सीन लस कमी पडत आहे. त्यामुळे कोव्हॅक्सीनच्या चाळीस लाख लसी आणि कोविशिल्डच्या ५० लाख लसी उपलब्ध करून द्यावात, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आज अनेक जण होमकिट्सच्या आणि रॅपिड अँटीजन चाचण्यांमधून घरच्या घरी चाचण्या करतात. त्यात अनेक जण पाँझिटिव्ह सापडतात. पण त्यांची आकडेवारी मिळत नसल्याची बाब आम्ही केंद्राच्या निदर्शनास आणून दिली. ज्या औषध कंपन्या या किट्सची विक्री करतात त्यांनी किट्सच्या विक्रीची माहिती ठेवावी. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी फोनवर संपर्क साधून माहिती घेण्याची सुचना यानिमित्ताने आम्ही राज्यातील अधिका-यांना दिली आहे, असे ते म्हणाले.

प्रोटोकॉलबाबत सुस्पष्टता गरजेची

महाराष्ट्रात चार हजार जीनोम सिक्वेन्स चाचण्या केल्या त्यात २ हजार ७०० नमुने डेल्टा व्हेटीयंटचे तर १३०० जण ओमायक्रोनचे आढळले. त्यामुळे महाराष्ट्रात डेल्टा व्हेरीयंट आजही प्रभावशाली आहे. अडीच लाख केसेसमध्ये ३० टक्के ओमायक्रोन आहे. अनेक राज्यांमध्ये उपचारांचे प्रोटोकॉल वेगवेगळे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने उपचारांच्या प्रोटोकॉलबाबत सुस्पष्टता आणावी, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

देशात सारखेच निर्बंध गरजेचे

वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्बंधांची माहिती पंतप्रधानांना दिली. काही राज्यात रात्र संचारबंदी आहे. काही राज्यात शाळा, महाविद्यालय बंद असल्याची माहिती पंतप्रधानांना दिली. केंद्राने कोणत्याही परिस्थितीत सर्व राज्यांसाठी निर्बधांच्या एसओपी जारी कराव्यात, अशी विनंती केली असता त्यावर आर्थिक नुकसान न होता निर्बंध पाळावेत, असे पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितल्याचे टोपे म्हणाले.

राज्याच्या मागण्या लेखी स्वरूपात पंतप्रधानांसमोर मांडल्या

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित नव्हते. राज्याच्यावतीने सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते. मात्र, बैठकीमध्ये या दोघांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे बैठकीत राज्याच्या मागण्या लेखी मांडण्यात आल्या.

बैठकीनंतर राजेश टोपे यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये फक्त मुख्यमंत्र्यांनाच बोलू द्यावे, असे त्यांनी ठरवल्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष बोलून मागण्या मांडता आल्या नाहीत. आम्हाला तशी परवानगी द्यावी, अशी विनंती देखील केली. मात्र, ते शक्य होऊ न शकल्यामुळे आम्ही लेखी स्वरूपात मागण्या मांडल्या, असे टोपे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com