राज्यात 'इतक्या' जणांना डेल्टा प्लस विषाणूची लागण

राज्यात 'इतक्या' जणांना डेल्टा प्लस विषाणूची लागण

मुंबई | Mumbai

राज्यात करोना विषाणूच्या (Corona) डेल्टा प्लस (Delta Plus Virus) प्रकाराने संक्रमित झालेले ६६ रुग्ण सापडले असून त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे...

महाराष्ट्रात (Maharashtra) करोना व्हायरसचा (Corona Virus) संसर्ग अद्यापही कायम असताना आता डेल्टा व्हायरस (Delta virus) नव्याने डोकं वर काढत आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात करोना विषाणूच्या डेल्टा प्लस प्रकाराने संक्रमित झालेले ६६ रुग्ण सापडले असून त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या ६६ रुग्णांपैकी काहींनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

राज्याच्या विविध भागातून घेतलेल्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेंसींग (Genome sequencing) तपासात ही प्रकरणे आली आहेत. रत्नागिरी, रायगड आणि बीडमध्ये शुक्रवारी डेल्टा प्लस प्रकारातून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत डेल्टा प्लस (Delta Plus) प्रकारामुळे रत्नागिरीमध्ये दोन, मुंबई, रायगड आणि बीडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सर्व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते आणि अनेक आजारांनी ग्रस्त होते.

मृतांपैकी दोघांना कोरोना विषाणूच्या लसीचे दोन्ही डोस मिळाले होते, दोघांना एक डोस मिळाला होता. त्याचबरोबर पाचव्या लसीकरणाबाबत (Vaccination) माहिती घेतली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com