दीपनगर औष्णिक केंद्रातील वीजनिर्मिती ठप्प
महाराष्ट्र

दीपनगर औष्णिक केंद्रातील वीजनिर्मिती ठप्प

Balvant Gaikwad

दीपनगर, ता. भुसावळ  – 

येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील विजनिर्मिती प्रतीयुनिट 3 रुपये 34 पैशांवर पोहचल्याने एमओडी (मेरिट ऑर्डर डिस्पॅच) लोड डिस्पॅच सेंटरच्याआदेशानुसार दीपनगरातील प्रत्येकी 500 मेगावॅट क्षमतेचे दोन्ही संच शटडाऊन करण्यात आल्यामुळे दि. 30 डिसेंबरपासून विजनिर्मिती ठप्प झाली आहे.

प्रकल्पातील कार्यरत तीन संचांपैकी  210 मेगावॅटचा संच क्र.तीन  वर्षभरापासून बंद आहे. त्यात आज 500 मेगावॅटचे दोन्ही संच बंद करण्यात आल्यामुळे प्रकल्पातील संपूर्ण 1210 मेगावॅट वीजेची निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रकल्पातील 500 मेगावॅटेचे संच क्रमांक चार व पाचमधून उच्चांकी विजनिर्मिती सुरु होती. मात्र ती महानिर्मितीसह अन्य खासगी वीज कंपन्यांकडून होणार्‍या विजनिर्मितीपेक्षा महागडी ठरत आहे. संच क्र. चार आणि पाचमधून निर्माण होणारी विज प्रतीयुनिट 3 रुपये 34 पैसे इतकी आहे. राज्यातील इतर विज निर्मिती केंद्राचे प्रतीयुनिट दर 2 रुपये 80 पैसे ते 3 रुपये 30 पैशांच्या दरम्यान आहेत. या तुलनेत येथील विज महाग असल्याने एमओडी तत्वानुसार येथील संच  चार आणि पाच बंद करण्यात आले आहेत.  दीपनगर केंद्रातील 210 मेगावॅट  क्षमतेचा संच क्रमांक तीन वर्षभरापासून बंदच आहे. आता पून्हा नवीन 500 मेगावॅटचे दोन्ही संचही बंदच्या निर्णयामुळे दीपनगरातून निर्माण होणारी वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे. येथील विज निर्मिती केंद्राला यापूर्वी विदर्भातील वेस्टर्न कोलफिल्डमधून कोळसा मिळत होता.

यामुळे या कोळशाचा वाहतूक खर्चही कमी होता. गेल्या तीन महिन्यांपासून साऊथ इस्ट कोलफिल्डमधून कोळसा मिळत असल्याने वाहतूकीसाठी खर्च वाढला. परिणामी प्रतीयुनिट विजनिर्मितीचे दरही वाढले. या प्रमुख कारणाने दीपनगरातील 500 मेगावॅटचे दोन्ही विस्तारीत संच एमओडीमध्ये गेल्याचेही महानिर्मितीच्या सूत्रांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com