दिलासा! मुंबईत अवघे तीन प्रतिबंधित क्षेत्र

दिलासा! मुंबईत अवघे तीन प्रतिबंधित क्षेत्र

मुंबई | Mumbai

मुंबईतील (Mumbai) झोपडपट्टी परिसरातून (Slum Area) दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील २४ वॉर्डपैकी फक्त २ वॉर्ड्समध्ये ३ प्रतिबंधित क्षेत्र (Containment zone) आता शिल्लक राहिले आहेत...

इतर वॉर्डमधील झोपडपट्टी विभाग हे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर आहेत. परंतु काही इमारतींचा परिसर अद्यापही करोनामुळे (Corona) त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे.

मुंबईत सध्या खूपच कमी प्रमाणात करोना बाधितांची (Corona Positive) नोंद होत आहे. मात्र इमारतींचे मजले सुरक्षिततेच्या दृष्टीने सील करण्यात आले आहेत. इमारतीच्या मजल्यावर एक किंवा दोन रुग्ण आढळल्यास आता संपूर्ण इमारत सील केली जात नाही. केवळ तो मजलाच सील केला जातो, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली.

आता मुंबईत दररोज साधारण ३०० ते ४०० रुग्ण आढळतात. नागरिकांनी अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन केल्यास रुग्णसंख्या अधिक कमी होण्यास मदत होईल. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मुंबईतील २४ वॉर्डपैकी २२ वॉर्डमध्ये सध्या एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. केवळ गोवंडी परिसरात (Govandi area) २ आणि कांदिवली परिसरात (Kandivali area) १ प्रतिबंधित क्षेत्र आहे. मुंबईत एकूण ५५ सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone) आहेत. म्हणजेच ५५ इमारतींपैकी ५ इमारतींमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबईतील एकूण इमारतींपैकी १६३६ मजले हे सील करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com