ठाण्यातील क्लस्टरची जबाबदारी महाप्रितवर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

ठाण्यातील क्लस्टरची जबाबदारी महाप्रितवर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित अर्थात महाप्रितवर ठाण्यातील समूह गृहनिर्माण प्रकल्प (क्लस्टर) राबविण्याची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय आज गुरुवार (दि.२०) रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सिडकोने ठाण्यातील ५० हेक्टर क्षेत्रावर क्लस्टर प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. सिडको, म्हाडा यासारख्या प्राधिकरणांना गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचा अनुभव असताना ठाण्यातील उर्वरित क्लस्टरची जबाबदारी महाप्रितवर (Mahapreit) सोपविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे...

ठाण्यातील क्लस्टरची जबाबदारी महाप्रितवर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' महत्वाचे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपाखाडीतील किसननगर १, किसननगर २ हाजुरी येथे क्लस्टरच्या माध्यमातून जुन्या, जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील काम सिडकोकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यातही खासगी विकासक पुढे येत नसल्याने सरकारने ठाण्यातील (Thane) क्लस्टरचे काम महाप्रितकडे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता महाप्रितच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे बांधण्यात येणार असल्याचा दावा सरकारने केला आहे.

ठाण्यातील क्लस्टरची जबाबदारी महाप्रितवर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची मुंबईत आत्महत्या

दरम्यान, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि नवीन योजना राबविण्यासाठी महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित-महाप्रित या सहयोगी कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत परवडणारी घरे आणि शहरी नियोजन, अक्षय ऊर्जा, कृषीमूल्य साखळी, पायाभूत सुविधा प्रकल्प, पर्यावरण उद्योन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रे आदी विविध शासकीय कामे करण्यास १० जुलै २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. यालाच अनुसरुन ठाणे शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसननगर येथे एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीमध्ये समूह विकास प्रकल्प राबविण्यासाठी ठाणे महापालिकेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा प्रकल्प राबविण्यास त्याचप्रमाणे महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाकडील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून २५ कोटी इतक्या रकमेची तीन वर्षात व्याजासह परतफेड करण्याच्या तत्वावर या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ठाण्यातील क्लस्टरची जबाबदारी महाप्रितवर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
Lalit Patil News : ललित पाटील प्रकरणात दोन महिलांना नाशिकमधून अटक; कोण आहेत या महिला?
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com