डेक्कन क्वीन आणि कोल्हापूर-मुंबई एक्सप्रेस रद्द

डेक्कन क्वीन आणि कोल्हापूर-मुंबई एक्सप्रेस रद्द

पुणे । प्रतिनिधी

वाढत्या करोनामुळे प्रवाशांची संख्या घटल्याने पुणे-मुंबई-एक्सप्रेस (डेक्कन क्क्वीन) पुढील सुचना येईपर्यंत शुक्रवारपासून (दि.14 मे) पासून रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस विशेष गाडी 18 मे पासून रद्द करण्यात आली आहे. मुंबई-कोल्हापूर एक्स्प्रेस 19 मे पासून पुढील सुचना येईपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत प्रवास करण्यावर निर्बंध असल्यामुळे रेल्वे गाड्या ठप्प होत्या. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाल्याने रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये इंद्रायणी एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन या गाड्यांचा समावेश होता.

परंतु पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या गाड्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली. मागील आठवड्यातच इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली होती.

तर आता 14 मे पासून पुणे-मुंबई धावणारी डेक्कन क्वीन ही रेल्वे गाडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ही रेल्वे बंद राहणार असल्याचे मध्य रेल्वे विभागाने सांगितले आहे.

दरम्यान पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या दोन्ही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने पुणे ते मुंबई दरम्यानच्या प्रवासासाठी आता स्वतंत्र गाडी नाही. पुणे मुंबई या दोन्ही शहरातून धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा आता पर्याय राहिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com