धक्कादायक! धान्यातील पावडरीच्या वासामुळे बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक! धान्यातील पावडरीच्या वासामुळे बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू

सातारा | Satara

कराड तालुक्यातील मुंढे येथे धान्यातील पावडरीच्या वासाने सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे...

तनिष्का अरविंद माळी (7) आणि श्लोक अरविंद माळी (3) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धान्याची साठवणूक करण्यासाठी घरात पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरात येत असल्यामुळे श्लोक व तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला.

धक्कादायक! धान्यातील पावडरीच्या वासामुळे बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांना वेळ असतानाही त्यांनी राजीनामा का दिला? - अ‌ॅड. हरीश साळवे

नातेवाईकांनी दोन्ही मुलांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मुंढेसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

धक्कादायक! धान्यातील पावडरीच्या वासामुळे बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू
“उद्योग-रोजगार पळवल्यावर आता ज्योतिर्लिंग...”; भीमाशंकर वादावरून सुप्रिया सुळे आक्रमक
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com