उष्माघातामुळे राज्यात तिसरा बळी; पाणी पीत असताना शेतकऱ्याचा मृत्यू

उष्माघातामुळे राज्यात तिसरा बळी; पाणी पीत असताना शेतकऱ्याचा मृत्यू

उस्मानाबाद | Osmanabad

सध्या राज्यातील उकाडा (Heat) वाढत चालला आहे. उष्माघाताने (Heatstroke) होणाऱ्या मृत्यूमध्येदेखील वाढ होत आहे. आता उस्मानाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे...

एका शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे समजते. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव लिंबराज सुकाळे (Limbaraj Sukale) असून मृत्युसमयी ते ५० वर्षांचे होते.

कळंब (Kalamb) तालुक्यातील हसेगाव येथील शेतकरी सुकाळे यांनी शेतातील कडबा बांधला. त्यानंतर त्यांनी गडबडीत पाणी पिले. पाणी पीत असताना उष्माघातामुळे त्यांचा शेतातच कोसळले.

त्यांना उपचारासाठी कळंब येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सुकाळे यांना तपासून त्यांना मृत घोषित केले. उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उस्मानाबादमध्ये (Osmanabad) उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे. यामुळे उष्माघाताच्या (Heatstroke) समस्या जाणवू लागल्या आहेत.

राज्यात उष्माघाताने मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. पहिली घटना ही जळगावममध्ये (Jalgaon) घडली होती. एका शेतकऱ्याचा उष्णाघाताने मृत्यू झाला होता. जितेंद्र संजय माळी (Jitendra Sanjay Mali) (33) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

तर दुसरी घटना अकोला (Akola) जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात घडली आहे. सारकिन्ही येथील एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. समाधान शामराव शिंदे (Samadhan Shamrao Shinde) (50) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Related Stories

No stories found.