मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले अन्...; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले अन्...; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

वसई | Vasai

एका व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरची निघृण हत्या केल्यानंतर तो मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवायचा. त्यानंतर तो ते मिक्सरमध्ये बारीक करत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेले साहित्य ताब्यात घेतले आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोडच्या गीता नगर येथील गीत आकाश दिप इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे मागील ३ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते.

तिचा लिव्ह इन पार्टनर मनिष साने याने सरस्वतीची हत्या केल्यानंतर विद्युत करवतीने (इलेक्ट्रीक सॉ) तिच्या शरारीचे तुकडे केले. हे तुकडे नष्ट करण्यासाठी त्याने ते कुकर मध्ये शिजवले आणि गॅसवर भाजले. नंतर ते तुकडे बकेट आणि टब मध्ये ठेवले.

मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले अन्...; महाराष्ट्राला हादरवणारी घटना
मान्सून केरळात कधी दाखल होणार? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

बुधवारी रात्री त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजार्‍यांनी पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर हे धक्कादायक दृश्य दिसले.

सुरुवातीला पोलिसांना तिचे पाय आढळले. धड आणि शीर नव्हते. त्याचा शोध घेतला असता घरातच ते कापून बकेट आणि पातेल्यात ठेवले होते. साने याने महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे असंख्य तुकडे केले.

ते कुकर मध्ये शिवजले आणि गॅसवर भाजले होते. पुरावा नष्ट कऱण्यासाठी त्याने ते घरातील पातेल्यात आणि बादलीत दडवून ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले अन्...; महाराष्ट्राला हादरवणारी घटना
Nashik Crime : फुगे विक्रेत्याचा चाकूने भोसकून खून
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com