दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर रुग्णालयात

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर रुग्णालयात

मुंबई | Mumbai

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याला जे. जे. रुग्णालयात (J J Hospital) दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शनिवारी दुपारनंतर अचानक इक्बाल कासकरने छातीत दुखू लागल्याची तक्रार केली. यानंतर त्याला ठाण्यातील तळोजा कारागृहातून मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इक्बाल कासकरला रुग्णालयाच्या 'आयसीयू'मध्ये ठेवण्यात आले आहे.

इकबाल कासकर याला ईडीने आर्थिक अफरातफर प्रकरणात अटक केली आहे. याआधी ठाणे पोलिसांच्या एका टीमने प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वात इकबाल कासकर याला सप्टेंबर २०१७ मध्ये अटक केली होती. इकबालवर एका विकासकाकडे खंडणीची मागणी केल्याचा आरोप होता. नंतर झालेल्या तपासात इकबाल कासकर याच्यावर तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये खंडणीची मागणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला.

तळोजा जेलमध्ये असलेल्या इकबाल कासकर याला ईडीने आर्थिक अफरातफर प्रकरणात जून २०२१ मध्ये ताब्यात घेतले. सध्या आर्थिक अफरातफर प्रकरणात इकबाल कासकर न्यायालयीन कोठडीत तळोजा जेलमध्ये आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com