दहीहंडीत जखमी झालेल्या प्रथमेश सावंतचा मृत्यू; दीड महिन्याची झुंज अपयशी

दहीहंडीत जखमी झालेल्या प्रथमेश सावंतचा मृत्यू; दीड महिन्याची झुंज अपयशी

मुंबई | Mumbai

मुंबईतील दहीहंडी उत्सवात (Dahi Handi 2022) गंभीर जखमी झालेल्या करी रोड येथील गोविंदाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. प्रथमेश सावंत (Prathamesh Sawant) असं या गोविंदाचं नाव आहे.

करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळातील जखमी गोविंदाचा गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून संघर्ष सुरू होता. मात्र, आज (शनिवार) त्याची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन महिन्यांपासून केईएम रुग्णालयात (KEM Hospital) त्याच्यावर सुरु उपचार होते.

उपचारादरम्यान त्याला न्युमोनिया झाला. त्याच दरम्यान आज सकाळी त्याला कार्डिएक अरेस्ट आल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रथमेश सावंतचे वय २० वर्ष होते. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. याआधी थरावरून कोसळलेल्या संदेश दळवी या तरुणाचे उपचारादरम्यान निधन झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com