Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळाचा राज्याला धोका, यंत्रणा सज्ज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासनाला 'या' सूचना
Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळाचा राज्याला धोका, यंत्रणा सज्ज

मुंबई | Mumbai

अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढत आहे. या क्षेत्रात आणि लक्षद्वीपच्या भागात ‘तौत्के’ चक्रीवादळ धडकण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

'तौत्के' चक्रीवादळ केरळच्या दिशेने सरकलं असलं तरी अनेक राज्यांना आणि शहरांना या वादळाचा धोका असणार आहे. मुंबईतही या चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतील तर यावेळी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी महत्त्वाचं काम नसल्यास घराबाहेर जाणं टाळावं. मुंबईसह अनेक उपनगरांत आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मुंबईत अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून वातावरणात गारवा आहे. यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत पहाटेच्या सुमारास दक्षिण मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. आज दिवसभर वातावरण असंच राहणार असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळाचा राज्याला धोका, यंत्रणा सज्ज
Cyclone Tauktae : चक्रीवादळाला 'तौत्के' नाव कसे पडले?, कोणी ठरवलं नाव? जाणून घ्या…

'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ऑनलाईन आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवण्यात यावी. तसंच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावं अशा सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे. तसंच मनुष्यबळ आणि साधन सामुग्री तयार ठेवावी असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, तौत्के चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची तयारी कशी सुरु आहे याबाबत माहिती देता ना महापौरांनी सांगितलं की, सहा चौपाट्यांवर पूर बचाव पथकं तैनात आहेत. पाणी साचणाऱ्या किनारी वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आतापर्यंत ३८४ झाडांची छाटणी केली आहे. तर २४ विभागीय नियंत्रण कक्ष सुविधांसह सुसज्ज आहेत. याशिवाय वरळी-वांद्रे सीलिंक आज आणि उद्या पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच किनाऱ्यावरील रहिवाशांना स्थानिक प्रशासनाकडुन सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.मच्छिमाराना समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com