
मुंबई | Mumbai
बंगालच्या उपसागरातील (Bay of Bengal) कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हवामान विभागाने (Department of Meteorology) याला मंदोस चक्रीवादळ (Cyclone Mandous) असे नाव दिले आहे.
या चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडील राज्यांना जास्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
राज्यात १५ डिसेंबरपर्यंत कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे.