
पुणे | Pune
आज २०५ वा शौर्य दिवस (Shaurya Din) साजरा करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे शौर्य दिनानिमित्तविजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. राज्यभरातून हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमामध्ये येथे दाखल झाले आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सकाळी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. तर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत.
सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभारला स्तंभ या युद्धात पेशव्यांच्या विरुद्ध महार रेजिमेंटच्या सैन्यांनी लढलेला समतेचा, हक्काच्या , न्यायाच्या लढाईत अनेकांनी आपले प्राण गमावले. युद्धात प्राणाची आहुती दिलेलया महार रेजिमेंटच्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाची उभारणी करण्यात आली. या स्तंभावर युद्धात वीरमरण पत्करलेल्या सैनिकाची नावे कोरण्यात आली आहेत.
डॉ. आंबेडकरांनीही विजय स्तंभाला दिली होती. मानवंदना शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ रोजी आपल्या अनुयायांसह भेट देत मानवंदना दिली होती. तेव्हापासून हजारो आंबेडकर दरवर्षी मोठ्या उत्साहाने भीमा कोरेगावला येतात.