पतीनेच बेडरुममध्ये कॅमेरा लावला आणि हा प्रकार आला समोर

पतीनेच बेडरुममध्ये कॅमेरा लावला आणि हा प्रकार आला समोर

पुणे |प्रतिनिधी| Pune

पत्नीच्या चारित्र्याचा संशय आल्याने पतीनेच पत्नीच्या बेडरुममध्ये कॅमेरा लावल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून नंदवा (नणंदेचे पती) पत्नीवर जबरदस्ती करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पतीने बेडरूमध्ये कॅमेरा लावला आणि पीडित महिलेवर नणंदेच्या पतीने बळजबरी करून शारीरिक संबंध ठेवला म्हणून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती आणि नणंदेचा पती या दोघांना चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ही घटना जुलै 2018 ते ॲागस्ट 2021 दरम्यान टेल्को कपुर सोसायटी, सेक्टर नं 24 , प्राधीकरण निगडी येथे घडली आहे. या प्रकरणी पिडीत 28 वर्षिय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती, सासरे, नंदावा आणि दोन महिला विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती हा नोकरीसाठी बाहेरगावी असल्याने याचा गैरफायदा घेऊन ३३ वर्षीय नणंदेच्या पतीने पीडित महिलेवर बळजबरी करून बलात्कार केला असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याबाबत संशय आल्याने पतीने बेडरूमध्ये कॅमेरा लावला, याद्वारे पीडित पत्नीवर बळजबरी करून घरातीलच व्यक्ती शारीरिक संबंध ठेवत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले.

दरम्यान, सासरच्या व्यक्तींनी फ्लॅट घेण्यासाठी २५ लाखांची मागणी केली आणि शारीरिक तसेच मानसिक त्रास दिला. तसेच बलात्काराच्या प्रकारानंतर पती आणि नणंदेच्या पतीने फिर्यादी आपला गर्भपात केला असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.