धक्कादायक! विवाहितेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक अत्याचार

धक्कादायक! विवाहितेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक अत्याचार

पैठण | प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील पारुंडी येथे शेतात सरपण आणण्यासाठी गेलेल्या बावीस वर्षीय विवाहित महिलेस एकटी पाहून तिघा सख्ख्या भावांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची मंगळवारी (ता.२०) पारुंडी (ता. पैठण) येथे घडली असून पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुरुवारी (ता. २२ ) रात्री "त्या" नराधम भावांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नितीन बाबासाहेब निसर्गे, संजय बाबासाहेब निसर्गे, विजय बाबासाहेब निसर्गे (सर्व रा. पारुंडी ता. पैठण) अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, पारुंडी (ता. पैठण) येथील बावीस वर्षीय विवाहिता मंगळवारी (ता. २०) दुपारी शेत गट क्रमांक ७३ मध्ये बांधावर असलेले मोसंबीच्या झाडांचे सरपण आणण्यासाठी गेली होती.यावेळी जवळच उभे असलेल्या तिघा सख्ख्या भावांनी तिला एकटी असल्याचे पाहून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.तसेच घटनेबाबत घरी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

धक्कादायक! विवाहितेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक अत्याचार
Video : ...अन् बिबट्याला लोकांनी खायला दिल्या चक्क 'चपात्या'; प्रकरण पोहोचलं पोलिस ठाण्यात, नेमकं काय घडलं?

घटनेनंतर पीडीत घरी गेली.तिने घडलेला प्रकार पती व सासूला सांगितला. आपली समाजात बदनामी होईल म्हणून त्याने दोन दिवस तक्रार दाखल करण्याचे टाळले. मात्र गुरुवारी (ता.२२ ) सायंकाळी तिघा भावांविरुद्ध अखेर पीडीतेने पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तांबे महिला दक्षता व भरोसा सेलच्या सहाय्यक जनाबाई सांगळे यांनी ''इन कॅमेरा ''महिलेचा जवाब नोंदवून तिघा भावांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हे नराधम आरोपी फरार झाले असून पाचोड पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

धक्कादायक! विवाहितेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक अत्याचार
लळा असा लावावा की...! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com