संतापजनक! दारूच्या नशेत निर्दयी बापाने पोटच्या मुलांना विहिरीत फेकलं; एकाचा मृत्यू

संतापजनक! दारूच्या नशेत निर्दयी बापाने पोटच्या मुलांना विहिरीत फेकलं; एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhaji nagar) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (sambhaji nagar crime) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एका निर्दयी बापाने आपल्या पोटाच्या दोन मुलांना विहीरीत फेकून दिल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय.

या घटनेत एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे. श्रेयस राजू भोसले (वय 7 वर्षे) असे मृत मुलाचे असून शिवम राजू भोसले (वय 9 वर्षे) असे बचावलेल्या मुलाचे नाव आहे. तसेच राजू प्रकाश भोसले (वय 33 वर्षे) असे निर्दयी बापाचे नाव आहे.

संतापजनक! दारूच्या नशेत निर्दयी बापाने पोटच्या मुलांना विहिरीत फेकलं; एकाचा मृत्यू
मामाचा खून करणार्‍या भाचाला जन्मठेप

दारुड्या बापाच्या या कृत्याने संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संभाजीनगर पोलिसांनी (Sambhaji Nagar Police) या प्रकरणी आरोपी बापाला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनी येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू भोसले हा वेल्डरचे काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. त्याच्या या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. राजुला श्रेयस आणि शंभू अशी दोन मुले आहेत. बायको सोडून गेल्यावर तोच त्यांचा सांभाळ करत होता. राजूचे वडील दोन्ही नातवांचा सांभाळ करत होते.

संतापजनक! दारूच्या नशेत निर्दयी बापाने पोटच्या मुलांना विहिरीत फेकलं; एकाचा मृत्यू
मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू

दरम्यान राजूने शुक्रवारी रात्री खूप दारू प्यायली. या दारूच्या नशेत त्याने दोन्ही मुलांना सोबत घेतले. त्याने दोघांना चौधरी कॉलनीपासून काही अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीत दोन्ही मुलांना ढकलून दिले. हा प्रकार या ठिकाणी राहत असलेल्या अनिरुद्ध दहीहंडे या तरुणाने पाहिला. त्याने क्षणाचाही विचार न करता विहिरीत उडी मारली. त्याने शंभूला बाहेर काढले.

संतापजनक! दारूच्या नशेत निर्दयी बापाने पोटच्या मुलांना विहिरीत फेकलं; एकाचा मृत्यू
नगर बाजार समिती निवडणूक मतदाना दरम्यान गोंधळ, भाजपची बस मतदान केंद्रावर आली अन्.... पाहा VIDEO

त्याने पुन्हा श्रेयसला शोधण्यासाठी विहिरीत उडी मारली. पण श्रेयस सापडला नाही. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक संजय चौधरी यांनी अग्निशमन दलास याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत शोध कार्य राबविले. जवानांनी बेशुद्ध श्रेयसला बाहेर काढून घाटीत दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com