‘पूर्वीचे पुणे विद्यापीठ’ हे लिहिण्याची पद्धत बंद करा !

सामंजस्य करारांतून बारा अभ्यासक्रमांची निर्मिती
पुणे विद्यापीठ
पुणे विद्यापीठ

नाशिक | Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांत देशाविदेशातील विविध संस्थांसह २६ सामंजस्य करार केले आहोत. करारांतून १२ अभ्यासक्रमांची निर्मिती झाली आहे.

अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांनी गेल्या दोन वर्षांत झालेले सामंजस्य करार, त्यातून निर्माण झालेल्या अभ्यासक्रमांचा तपशील विचारला होता. ‘विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांत २६ सामंजस्य करार केले. या सामंजस्य करारांतून १२ अभ्यासक्रमांची निर्मिती झाली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, संस्थांसह केलेल्या कराराअंतर्गत चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट या राष्ट्रीय संस्थांसह केलेल्या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, इंटर्नशीपची सुविधा प्राप्त होणार आहे,’ अशी माहिती नवोपक्रम आणि नवसंशोधन केंद्रातर्फे देण्यात आली. ती पद्धत बंद करा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नामविस्तार होऊन पाच वर्षे होऊन गेली आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या नावापुढील ‘पूर्वीचे पुणे विद्यापीठ’ हे लिहिण्याची पद्धत बंद करावी, असा ठराव अधिसभा सदस्य डॉ. कान्हू गिरमकर यांनी मांडला आहे. तर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा प्रस्ताव शशिकांत तिकोटे यांनी मांडला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com