महाराष्ट्रात Omicron बाधितांचा आकडा ८८ वर, २ वर्षांच्या मुलाचाही समावेश

कुठे किती रूग्ण?
महाराष्ट्रात Omicron बाधितांचा आकडा ८८ वर, २ वर्षांच्या मुलाचाही समावेश
कराेना रुग्ण

मुंबई | Mumbai

करोनाच्या (Covid-19) नव्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटने जगभरात हाहा:कार माजवला आहे. महाराष्ट्रासह देशात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे सावट गडद झाले असून, राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रात ओमिक्रॉन बाधितांचा आकडा ८८ वर पोहचला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. दरम्यान या बाधितांमध्ये २ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. मोहा येथील ३१ वर्षीय पिता आणि त्यांच्या २ वर्षीय मुलाचा ओमिक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मोहा येथील हे दोघे घाना देशातून आले होते.

कुठे किती रूग्ण?

मुंबई - ३३

पिंपरी- १९

पुणे ग्रामीण - १०

पुणे मनपा - ६

उस्मानाबाद - ५

सातारा - ३

कल्याण-डोंबिवली - २

बुलढाणा - १

नागपूर - १

लातूर - १

वसई विरार - १

नवी मुंबई - १

ठाणे - १

मीरा भाईंदर - १

एकूण - ८८

दरम्यान ओमिक्रॉनच्या वाढत्या पार्दुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली याची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज विधानसभेच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाच्याआधी सभागृहामध्ये प्रवेश करताना पत्रकारांशी बोलताना दिली.

मलिक यांनी म्हटलं आहे की, 'काल कॅबिनेटमध्ये कोविडबाबत चर्चा झाली. यामध्ये १८ टक्के रुग्ण दरदिवशी वाढत आहेत. तिसरी लाट ही जानेवारीमध्ये येऊ शकते,” असं नवाब मलिक म्हणाले. तसेच पुढे बोलताना, मुख्यमंत्री महोदयांनी काल रात्री टास्क फोर्सही बैठक घेतली. वाढता करोना आणि राज्यात वाढत असलेले ओमायक्रोनचे रुग्ण याचा विचार करून राज्यात आज निर्बंध लावले जाऊ शकतात, असंही मलिक यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com