करोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याबाबतचा 'तो' निर्णय मागे?

करोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याबाबतचा 'तो' निर्णय मागे?

मुंबई | Mumbai

संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) गेल्या दीड वर्षांपासून करोनाचे संकट (Corona Crisis) घोंगावत असल्याने शाळा (School) बंद आहेत. मुलांचं शिक्षण (Education) हे दीड वर्षांपासून ऑनलाइन (Online) पद्धतीनेच सुरू आहे.

दरम्यान, करोनामुक्त (Corona free) क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संमतीने ८ वी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय सोमवारी शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला होता, मात्र अवघ्या काही तासांतच या निर्णयाबाबत विभागाने यु टर्न घेतला आहे. दरम्यान निर्णयात काही तांत्रिक त्रुटी असून त्यातील दुरुस्तीच्या कारणावरून तो शासन निर्णयाच्या संकेतस्थळावरून हटविण्यात आला आहे.

याबाबत, आवश्यक त्या दुरुस्ती करून तो पुन्हा जारी करण्यात येईल अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकारी देत असले तरी शिक्षण विभागातील असमन्वय आणि घाई गडबडीत घेतलेले निर्णय यावरून समोर येत असल्याच्या चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगू लागल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com