राज्यात १ मे पासून लसीकरण नाही

राज्यात १ मे पासून लसीकरण नाही

मुंबई | Mumbai

देशभरात कोरोना लसीकरणाचा मोठा व तिसरा टप्पा १ मे पासून सुरु होत आहे. या टप्यात १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

Title Name
BREAKING : आरोग्यमंत्र्यांची घोषणा : राज्यात लॉकडाऊन वाढणार
राज्यात १ मे पासून लसीकरण नाही

राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे १ मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या १ मे रोजी राज्यातील १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

तसेच, १८ - ४४ वयोगटातील लोकांना विनंती आहे की त्यांनी सबुरीनं घ्यावं लागेल. लसीच्या कमतरतेमुळं १मेपासून लसीकरण शक्य नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी लोकांचं लसीकरण एकाच वेळी करणं शक्य नाही. त्यामुळं एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समिती एक मायक्रोप्लानिंग करणार आहे. त्यामध्ये वयोगटानुसार लसीकरण राबवण्याची चर्चा करण्यात येईल. १८- ४४ वयोगटासाठी वेगळी लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तिथं फक्त याच वयोगटातील लोकांचं लसीकरण करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Title Name
ठरलं ! राज्यात सर्वांना मोफत लस, सहा महिन्यात सर्वांचे लसीकरण
राज्यात १ मे पासून लसीकरण नाही

दरम्यान, राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com