नागपूरात नव्या करोनाचा शिरकाव?

इंग्लंडमधून परतलेल्या तरुणासह संपर्कातील आठ जण बाधित
नागपूरात नव्या करोनाचा शिरकाव?

नागपूर -

इंग्लंडमध्ये करोनाचा एक नवा प्रकार आढळून आला आहे. हा करोनाचा नवीन स्ट्रेन जगभरात धुमाकूळ घालणार्‍या आधीच्या स्ट्रेनपेक्षा जास्त धोकादायक

असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या नव्या व्हायरसवर संशोधन सुरू असताना नागपूरमध्ये संशयित रूग्ण आढळला आहे. हा तरुण इंग्लंडहून परतलेला आहे. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांनाही करोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. तरुणावर उपचार सुरु असून पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तरूणाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com