“राज्यात रुग्णसंख्या वाढतेय, दोन दिवसांत...”; राजेश टोपे यांचे मोठे विधान

“राज्यात रुग्णसंख्या वाढतेय, दोन दिवसांत...”; राजेश टोपे यांचे मोठे विधान
राजेश टोपे

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनाचा (covid19) उद्रेक होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. राज्यात मंगळवारी दिवसभरात तब्बल दोन हजाराहून अधिक करोना संक्रमित रूग्ण आढळून आले आहेत. मागील दीड महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसात 2 हजारांहून जास्त रूग्ण आढळले असून, यामुळे यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत दोन दिवसांत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलतांना म्हणाले की, मागील आठ दिवसात पाहिलं तर २० डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा दरम्यान सक्रिय रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात ११ हजार ४९२ रुग्ण आहेत. २० हजारांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. मुंबईची तुलना केली तर मुंबईत ३०० च्या आसपास केसेस होत्या, आज १३०० केसेस आहेत. आज संध्याकाळी रिपोर्ट होतील त्यातून अंदाजे २२०० केसेस रिपोर्ट होतील. सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात डबलिंग होत आहे अशी परिस्थिती आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे पुढे बोलतांना म्हणाले की, राज्यात करोनाची वाढणारी रुग्णसंख्या हा धोक्याचा अलार्म आहे. दोन दिवसांमध्ये रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यात मुंबईचा पॉझिटिव्हीची रेट हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ याबाबत निर्णय घेईल. तसेच राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढत असून लोकांकडून नियमांचं पालन केलं जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com