भाजपाकडून राज्यातील प्रत्येक शहरात कोविड सेंटर

मिळणार मोफत उपचार
भाजपाकडून राज्यातील प्रत्येक शहरात कोविड सेंटर

औरंगाबाद - Aurangabad :

शिवसेनेपाठोपाठ आता भाजपानेही पूर्व विधानसभा मतदारसंघात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. भाजपा आमदार अतुल सावे यांनी सीएसआर निधीच्या माध्यमातून गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रोडवर हे मोफत कोविड सेंटर सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

करोनाच्या या संकटकाळात शासन व प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. मात्र रुग्णसेवा हेच कार्य समजून लोकांच्या आरोग्य सुविधा द्यावी, असे आदेश देण्यात आले होते.

त्याप्रमाणे शहरातील आ.अतुल सावे यांनी गजानन महाराज मंदिर ते पुंडलीकनगर रोडवर मोफत कोविड सेंटर सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

यावेळी ते म्हणाले की, या कोविड सेंटर मध्ये सर्व रूग्णाला मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. हे कार्य सेवाकार्य म्हणून सुरू केले यातून लवकरात लवकर करोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय सचिव विजया रहाटकर, प्रदेश प्रवक्ते शिरिष बोराळकर, खासदार डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, आ. नारायण कुचे, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, बालाजी मुंडे, अँड. माधुरी अदवंत, अमृता पालोदकर, प्रशांत देसरडा, भगवान घडामोडे, प्रशांत नांदेडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

करोनाचे रुग्ण वाढत असल्याने रूग्णाला उपचारासाठी बेड मिळत नाही. ऑक्सिजन बेडअभावी अनेकांना जीव गमवावा लागला. हे लक्षात घेता आता भाजपच्या वतीने प्रत्येक शहरात कोविड सेंटर सेवा प्रकल्प सुरू केले जात आहे. त्यामध्ये सेवा हेच संघटनेचे कार्य मानुन काम करावे, असे आवाहन याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com