मुंबई -

महाराष्ट्रात करोना विषाणूच्या संसर्गात आता पुन्हा एकदा वेगाने वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन

स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये तर पुन्हा लॉकडाउन देखील लागू केला जात आहे. राज्यात आज गुरुवारी 5 हजार 427 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 38 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 20 लाख 81 हजार 520 इतकी झाली आहे.

दरम्यान, गुरुवारी 2 हजार 543 जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यभरात 19 लाख 87 हजार 804 जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.5 टक्के आहे. तर, अॅक्टिव्ह केसेसची संख्या 40 हजार 858 असून, आजपर्यंत करोनामुळे 51 हजार 669 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत राज्यात तपासणी करण्यात आलेल्या 1,55,21,198 नमून्यांपैकी 20 लाख 81 हजार 520 (13.41 टक्के)नमूने पॉझटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 16 हजार 908 जण गृहविलगीकरणात असून 1 हजार 743 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.