धक्कादायक; राज्यात महिनाभरात 1 लाख करोनाग्रस्तांची वाढ

देशात करोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला
धक्कादायक; राज्यात महिनाभरात 1 लाख करोनाग्रस्तांची वाढ

मुंबई - देशात करोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात करोना संसर्गाची लागण झालेले सर्वात जास्त रुग्ण आहेत. जून महिन्यात महाराष्ट्रात तब्बल 1 लाख करोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सध्या करोनाबाधितांची एकूणरुग्णसंख्या 1 लाख 80 हजार 298 इतकी झाली आहे. राज्यात 9 मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. तर 17 मार्च रोजी मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती.

1 जून रोजी राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या 70 हजार 13 इतकी होती. 30 जून रोजी ही संख्या 1 लाख 74 हजार 761 वर पोहोचली. म्हणजेच एका महिन्यात राज्यात 1 लाखाहून अधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 1 जून रोजी मुंबईतील करोनाबाधित रुग्णसंख्या41 हजार 99 इतकी होती. 30 जून रोजी ही संख्या 77 हजार 658 वर पोहोचली. एका महिन्यात मुंबईत करोनाबाधित रुग्णसंख्येत 36 हजार 559 इतकी वाढ नोंदवण्यात आली.

दरम्यान, राज्यात बुधवारी 5 हजार 537 करोनाबाधित रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली. तर 2 हजार 243 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 93 हजार 154 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात सध्या 79 हजार 75 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com