करोना म्हणजे थोतांड - संभाजी भिडे

वारकर्‍यांनी रस्त्यावर उतरुन मंदिरांची कुलुपं तोडायला हवीत
करोना म्हणजे थोतांड - संभाजी भिडे

सांगली / Sangli - करोना (coronavirus) म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी म्हटले आहे. पंढरपूरच्या वारीवर घेण्यात आलेल्या बंदीच्या बाबतीत खरंतर वारकर्‍यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं होतं आणि आजचे राज्यकर्तेही किमतीचे नाहीत असेही ते म्हणाले. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

करोना संकटामुळे यंदाही राज्य सरकारने पंढरपूरच्या वारीवर बंदी (Pandharpur Ashadi Wari) घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर संभाजी भिडे सांगली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. कारण काय तर वारीमुळे करोना वाढू शकतो. मात्र करोना म्हणजे थोतांड आहे, करोना वगैरे काही नाही. लॉकडाऊन हा सरकारचा अत्यंत चुकीचा निर्णय आहे.

वारकर्‍यांनी रस्त्यावर उतरुन मंदिरांची कुलुपं तोडायला हवीत, पंढरपूरच्या वारीवर बंदी घातली नसती, तर देशात करोनाचा एकही रुग्ण सापडला नसता. माझं मत आहे की, देशात करोनाच्या नावाने मोठे षडयंत्र सुरू आहे, असेही संभाजी भिडे म्हणाले.

करोना म्हणजे थोतांड - संभाजी भिडे
आषाढी वारीमुळे करोना नामशेष होईल
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com