लॉकडाऊन उठला तरी काही निर्बंध कायम
महाराष्ट्र

लॉकडाऊन उठला तरी काही निर्बंध कायम

दुकानं सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत सुरू राहणार

Rajendra Patil Pune

पुणे (प्रतिनिधी) |Pune — पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दहा दिवसांचा लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. मात्र, शुक्रवारपासून दहा दिवसांपूर्वी जशी सूट होती तशी सुट नसेल असेही जिल्हधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊन उठवताना काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. हे निर्बंधा वगळता १४ जुलैच्या आधीसारखीच पुण्यात लोकांना त्यांची कामे आणि व्यवसाय करण्यासाठी परवानगी असेल.

काय असतील निर्बंध?

• पुण्यातील दुकानं सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत सुरू राहणार

• रात्री ९ ते पहाटे ५ या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणारे लोक वगळता इतर कोणालाही बाहेर पडता येणार नाही

• पुण्यात येथून पुढे लग्न समारंभ आणि अंत्यविधीप्रसंगी २० लोकांनाच उपस्थित राहता येईल.

कशाची असेल मुभा?

• प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सार्वजनिक ठिकाणी आणि मैदानांवर व्यायाम करता येईल. धावणे, सायकलींग करता येईल.

• मात्र जीम बंद राहतील.

• सकाळी ५ ते ७ या वेळेत व्यायाम करता येणार.

• लहान मुलांसोबत मोठी व्यक्ती हवी , मैदानांवर गर्दी करता येणार नाही.

• व्यायामाची सामायिक उपकरण वापरता येणार नाहीत (ओपन जिम).

• दुकाने पी१-पी२ प्रमाणे सुरू राहतील.

• खाजगी कार्यालय १० टक्के किंवा १५ जण यापैकी जे अधिक तितक्या लोकांना बोलवून कामकाज करता येणार आहे.

• हॉटेल्स, मॉल, जीम, व्यापारी संकुल, पोहण्याचे तलाव बंदच राहणार.

• हॉकर्सना व्यवसाय सुरू करता येणार.

• पार्सल, कुरियर सुरू राहणार.

• घरमालकाची परवानगी असल्यास घरेलू कामगार , ज्येष्ठ रूग्ण मदतनीस (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर)

• सगळीकडे मास्क वापरणं बंधनकाराक

• ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण बाहेर पडता येणार नाही

Deshdoot
www.deshdoot.com