पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

41 रुग्णांचा मृत्यू
पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

पुुणे -

पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या 1 लाख 42 हजार 136 एवढी झाली आहे. आज दिवसभरात शहरात नव्याने

1548 रुग्ण आढळून आले. त्यामुळे तर दिवसभरात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही माहिती देण्यात आली.

पुण्यात आज अखेर 3 हजार 373 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 1599 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 21 हजार 176 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर, पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी दिवसभरात 812 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 22 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 914 जण आज करोनातून मुक्त झाले त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 76 हजार 79वर पोहचली असून यांपैकी, 62 हजार 718 जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4 हजार 745 एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com