राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

19 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई -

महाराष्ट्र्रातील एकूण रुग्णसंख्येने 13 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज राज्यात

17 हजार 794 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील 24 तासांमध्ये करोनामुळे 416 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या 13 लाख 757 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये 19 हजार 592 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर महाराष्ट्रात 9 लाख 92 हजार 806 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 76.33 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजवर तपासण्यात आलेल्या 62 लाख 80 हजार 788 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 13 लाख 757 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19 लाख 29 हजार 572 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 32 हजार 747 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 2 लाख 72 हजार 775 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.

आज राज्यात 17 हजार 794 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या 13 लाख 757 इतकी झाली आहे. मागील 24 तासांमध्ये 416 मृत्यूंची नोंद झाली आहे. ज्यापैकी 228 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 106 मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित 82 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालवाधीपूर्वीचे आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com