महाराष्ट्रात 11 हजार 111 नवे करोनाबाधित
महाराष्ट्र

महाराष्ट्रात 11 हजार 111 नवे करोनाबाधित

दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

महाराष्ट्रात रविवारी 11 हजार 111 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर दिवसभरात 288 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या सहा लाखांच्या जवळ पोहोचली आहे. दरम्यान, रविवारी उपचारानंतर तब्बल 8 हजार 837 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. coronavirus patients in maharashtra

रविवारी राज्यात 11 हजार 111 करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 5 लाख 95 हजार 865 वर पोहोचली आहे. तर राज्यात सध्या 1 लाख 58 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. आतापर्यंत 4 लाख 17 हजार 123 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 20 हजार 037 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दरही 70 टक्क्यांवर पोहोचला आहे.

मुंबईत 1 हजार 010 रुग्ण

मुंबईत रविवारी 1 हजार 010 नव्या करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 719 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं असून दिवसभरात 47 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आली. मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 28 हजार 726 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 3 हजार 468 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या 17 हजार 828 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत 7 हजार 130 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com