राज्यात 4 लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त
महाराष्ट्र

राज्यात 4 लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

राज्यात आतापर्यंत 4 लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. health minister Rajesh Tope

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 12 हजार 608 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 364 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 10 हजार 484 रुग्ण मागील 24 तासांमध्ये करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची बाधा झालेल्यांची संख्या 5 लाख 72 हजार 734 इतकी झाली आहे. यापैकी 4 लाख 1 हजार 442 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 1 लाख 51 हजार 555 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन 19 हजार 427 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. coronavirus patients in maharashtra

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 30 लाख 45 हजार 85 नमुन्यांपैकी 5 लाख 72 हजार 734 नमुने पॉझिटिव्ह (18.8 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 32 हजार 105 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 37 हजार 386 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज 364 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.39 टक्के एवढा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com