राज्यात करोना रुग्णसंख्येने ओलांडला पाच लाखांचा टप्पा
महाराष्ट्र

राज्यात करोना रुग्णसंख्येने ओलांडला पाच लाखांचा टप्पा

शनिवारी 12 हजार 822 नवे करोनाबाधित

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

राज्यात करोनाबाधितांची संख्या आता 5 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात तब्बल 12 हजार 822 नवे करोनाबाधित आढळले तर 275 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. coronavirus patients in maharashtra

यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या 5 लाख 3 हजार 84 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार घेत असलेले 1 लाख 47 हजार 48 रुग्ण तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या 17 हजार 367 जणांचा समावेश आहे.

राज्यात षनिवारी 11 हजार 81 रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर, आतापर्यंत राज्यात तब्बल 3 लाख 38 हजार 262 जण करोनामुक्त झाले आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट 67.26 टक्क्यांवर पोहचला आहे. तर मृत्यू दर 3.45 टक्के इतका आहे. सध्या राज्यात तब्बल 9 लाख 89 हजार 612 जण गृहविलगीकरणात (होमक्वारंटाईन) आहेत. तर, 35 हजार 625 जण संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन)मध्ये आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com