पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

703 नवे रुग्ण
पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे -

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 703 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर

22 रुग्णांचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 461 रुग्ण आढळून आले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात एकूण करोनाबाधितांची संख्या 1 लाख 53 हजार 600 वर पोहोचली आहे. तर आज अखेर 3 हजार 808 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 1117 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 36 हजार 492 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

तर पिंपरी-चिंचवडमध्ये 529 जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. इथे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 83 हजार 433 वर पोहचली असून यांपैकी 77 हजार 766 जण करोनातून बरे झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 703 एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com