पुण्यात 1 हजार 577 नवे करोना बाधित, 33  मृत्यू
महाराष्ट्र

पुण्यात 1 हजार 577 नवे करोना बाधित, 33 मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 1 हजार 61 करोनाबाधित, 13 रुग्णांचा मृत्यू

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

पुणे | Pune -

पुणे शहरात आज 1 हजार 577 नवे करोनाबाधित आढळले तर 33 रुग्णांचा मृत्यू झाला. करोनाबाधितांची एकूण संख्या 82 हजार 170 झाली आहे. आज अखेर 1 हजार 950 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर, करोनावर उपचार घेणार्‍या 1 हजार 427 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 65 हजार 346 रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. तर

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 1 हजार 61 करोनाबाधित रुग्ण आढळले असून 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज 946 जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या 40 हजार 898 वर पोहचली आहे. यापैकी, 27 हजार 166 जण करोनामुक्त झाले आहेत. तर, महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 7 हजार 42 एवढी असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com