पुण्यात करोनानेे 35 तर पिंपरीत 41 रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात 1211 तर पिंपरीत 865 नवे रुग्ण
पुण्यात करोनानेे 35 तर पिंपरीत 41 रुग्णांचा  मृत्यू

पुणे |Pune -

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 1211 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे 77 हजार 368 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 1 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणारे पुणे शहरातील 1089 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 60 हजार 963 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. coronavirus patient in pune and Pimpri Chinchwad

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 865 करोना बाधित रुग्ण आढळले असून 41 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने शहरातील आणि ग्रामीण भागातील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 141 जण करोनामुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण बाधित रुग्णांची संख्या 37 हजार 716 वर पोहचली असून पैकी, 25 हजार 399 जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेले सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 137 आहे अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com