पुण्यात सोमवारी ‘इतके’ नवे रुग्ण

महापालिकेची माहिती
पुण्यात सोमवारी ‘इतके’ नवे रुग्ण

पुणे | Pune -

पुणे शहरात करोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होत आहे. शहरात सोमवारी दिवसभरात नव्याने

876 रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या 95 हजार 373 एवढी झाली आहे. सोमवारी दिवसभरात 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोमवारी दिवसा अखेर शहरात करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 2 हजार 304 पर्यंत पोहचली आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 1384 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी दिवसाअखेर 78 हजार 070 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे. coronavirus patient in pune

दरम्यान दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात, सोमवारी दिवसभरात 598 करोना बाधित रुग्ण आढळले असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी करोनामुक्त झालेल्या एक हजाराहून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता 50 हजारांच्या उंबरठ्यावर असून सोमवारी दिवसाअखेरीस ही संख्या 49 हजार 330 वर पोहचली आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 456 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com