पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

पुणे / pune - पुण्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 287 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 346 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

पुणे शहरातील सक्रिय रूग्ण संख्या 2 हजार 867 इतकी असून, आज दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला आह़े.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयात 227 रुग्ण गंभीर असून 387 ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.

शहरातील तब्बल 28 लाख 8 हजार 884 जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी 4 लाख 84 हजार 702 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 4 लाख 73 हजार 126 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आतापर्यंत एकूण 8 हजार 867 जणांचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com