पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

पुणे (प्रतिनिधी) / Pune - पुण्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 310 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 276 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

पुणे शहरातील सक्रिय रूग्ण संख्या 2 हजार 815 इतकी असून, आज दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला आह़े. यापैकी 6 जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरात आतापर्यंत 8 हजार 702 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा 1. 79 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही 229 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणार्‍यांची संख्या 389 इतकी आहे. शहरात आतापर्यंत 27 लाख 99 हजार 187 जणांची करोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी 4 लाख 84 हजार 356 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी 4 लाख 72 हजार 839 जण करोनामुक्त झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com