पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

पुणे / Pune - पुण्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 228 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 287 नवे करोना (coronavirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला असून 3 हजार 85 सक्रिय रुग्ण आहेत. खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर 6 हजार 74 नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.शहरात आतापर्यंत 8 हजार 652 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 227 रुग्ण गंभीर असून 491 ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल 27 लाख 36 हजार 235 जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी 4 लाख 81 हजार 834 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 4 लाख 70 हजार 97 नागरिक कारोनामुक्त झाले आहेत. .

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com