पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

पुणे / Pune - पुण्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 253 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 331 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत 8 कोरोनाबाधित (coronavirus) रुग्ण तर पुण्याबाहेरील 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 636 इतकी झाली आहे.

शहरात 244 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 2941 झाली आहे. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 80 हजार 913 इतकी झाली आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 69 हजार 336 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com