पुण्यात गेल्या 24 तासांत ‘इतके’ नवे करोना रूग्ण

पुण्यात गेल्या 24 तासांत ‘इतके’ नवे करोना रूग्ण

पुणे - गेल्या 24 तासांत पुणे शहरात 1 हजार 317 नवे करोना रुग्ण आढळले आहेत तर 73 रुग्णांचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 59 हजार 303 इतकी झाली आहे. पुणे शहरात दिवसभरात 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 48 रुग्ण शहरातील आहेत तर 26 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 706 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 2 हजार 985 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 31 हजार 008 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (रविवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 11 हजार 553 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 20 हजार 589 इतकी आहे. यापैकी 1415 रुग्ण गंभीर आहेत.

पुणे जिल्ह्यातील एकूण 9 लाख 64 हजार 119 कोरोना बाधित रुग्णांपैकी 8 लाख 66 हजार 389 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण 82 हजार 621 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.57 टक्के इतके आहे तर बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 89.86 टक्के आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com