पुणे -

पुणे शहरात शनिवारी 1 हजार 633 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 12 रूग्णांचा मृत्यू

झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 16 हजार 463 झाली आहे. तर, आतापर्यंत 4 हजार 937 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज 638 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजअखेर 2 लाख 803 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 811 करोनाबाधित रुग्ण आढळले असून, 487 जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 13 हजार 181 वर पोहचली आहे. यापैकी, 1 लाख 4 हजार 853 जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 309 असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.