पुण्यात आज 29 करोना रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्र

पुण्यात आज 29 करोना रुग्णांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये 30 जणांचा मृत्यू

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

पुणे | Pune -

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 1224 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच 76 हजार 157 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 1 हजार 814 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 1168 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 59 हजार 874 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे. coronavirus patient in pune

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 807 जण करोना बाधित रुग्ण आढळले असून 30 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 198 जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या 36 हजार 863 जण पोहचली असून पैकी 25 हजार 258 जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 806 एवढी आहे. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com