पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

27 रुग्णांचा मृत्यू
पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

पुणे -

पुणे शहरात आतापर्यंत 1 लाख 39 हजार 450 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. आज दिवसभरात नव्याने

486 रुग्ण आढळल्याने 1 लाख 55 हजार 67 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 3 हजार 871 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणारे 998 रुग्ण बरे झाल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 246 करोना बाधित रुग्ण आढळले असून 18 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 520 जण आज करोनातून मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 84 हजार 275 वर पोहचली असून पैकी, 79 हजार 278 जण करोनातून बरे झाले आहेत.

महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 509 येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com