पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले ‘इतके’ करोनाबाधित रुग्ण
पुण्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

पुणे | Pune -

पुण्यात करोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात नव्याने

1916 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 1298 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 1,13,812वर तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 59,966 वर पोहोचली आहे. दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

पुण्यात आज दिवसभरात 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 2,668 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 1838 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आज अखेर 94 हजार 452 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर, पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 557 जण आज करोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 60 हजारांच्या उंबरठ्यावर असून 59 हजार 966 वर पोहचली आहे. यांपैकी, 45,732 जण करोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयातील सक्रिय रुग्णांची संख्या 6,222 एवढी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com