राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 96.24 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई / Mumbai - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 5 हजार 756 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 9 हजार नवे करोना (coronavirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

तसेच 180 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 80 हजार 350 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.24 टक्के इतके झाले आहे.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 54, 81, 252 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62, 14, 190 (13.66 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5, 67, 585 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 4 हजार 66 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 1, 03, 486 क्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com